Breaking

रविवार, १ नोव्हेंबर, २०२६

सोलापूरच्या हासिना सलीम तांबोळी यांचे हृदयविकाराने निधन; तांबोळी परिवारावर शोककळा


​नीरा नरसिंहपूर : प्रतिनिधी ​सोलापूर येथील रहिवासी हासिना सलीम तांबोळी (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने नीरा नरसिंहपूर परिसरासह सोलापूर जिल्ह्यातील तांबोळी  परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हासिना तांबोळी यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. निधनासमयी त्यांचे वय ५० वर्षे होते. अत्यंत मिलाफू आणि हसतमुख स्वभावामुळे परिसरात त्यांचा मोठा आपुलकीचा स्नेहबंध होता.


​त्यांच्या पश्चात पती सलीम तांबोळी, मुलगी शाहिस्ता, मुलगा सोहेल तांबोळी असा मोठा परिवार आहे. त्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख यांच्या भाची, तर दैनिक 'सकाळ'चे पत्रकार शौकत तांबोळी यांच्या धाकट्या बहीण होत्या. ​त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, तांबोळी परिवाराचे सांत्वन करत मृत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.