विशेष प्रतिनिधी:-महादेव मोहिते
टणु येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी जनार्दन वसंत मोहिते यांची तर व्हाईस चेअरमनपदी सरुबाई पोपट जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
इंदापूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात आज दि ४/५/२०२६रोजी ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बापूसाहेब खंडेराव शिवरकर यांनी जाहीर केले. यावेळी गाव पातळीवर झालेल्या निर्णयानुसार सर्व गावकरी यांनी गावच्या भल्यासाठी एकमताने आपला एकमेव अर्ज दाखल झाल्याने जनार्दन वसंत मोहिते यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली .यापूर्वी टणु विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या पदाधिकारी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोसायटीच्या निवडणुकीच्या रिक्त पदासाठी सर्व संचालक मंडळाची सभासदांची सभा बोलविण्यात आली होती यावेळी नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करून पुढील कार्यास शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम उत्साहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी इंदापूर पंचायत समिती सदस्य शिवाजी विजयसिंह मोहिते दादा पाटील, निराभिमा सहकारी साखर कारखाना संचालक प्रकाश शहाजी मोहिते, टणु विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे सचिव दुनाखे भाऊसाहेब, बलभीम मोहिते,समीर मोहीते,सोमनाथ मोहिते, राजेंद्र मोहिते,नाथाजी मोहिते,अमोल मोहिते, विनोद मोहिते, संदिप मोहिते,नितीन मोहिते, कविराज मोहिते, संतोष मोहिते, वैभव मोहिते, आनंद जगताप ,कुलदीप मोहिते, महेश मोहिते सागर जगदाळे आदी मान्यवर आजीमाजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



