Breaking

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

अजितदादा ग्रामीण पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना तब्बल १२% लाभांश जाहीर!

संपादक... रियाज मुलाणी मो.9921500780

माळीनगर:येथील 'अजितदादा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. माळीनगर' या संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या शाळा हॉलमध्ये सायंकाळी ५:३० वाजता अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. संस्थेच्या उत्कृष्ट आणि पारदर्शक कारभारामुळे चालू आर्थिक वर्षासाठी सभासदांना तब्बल १२% लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला असून, संस्थेला पुन्हा एकदा 'अ' ऑडिट वर्ग मिळाला आहे.


सभेचा प्रारंभ श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन अरुण मदने, व्हाईस चेअरमन हरिदास कांबळे, तसेच संचालक श्री.निलेश गिरमे, श्री.कपिल भोंगळे, श्री विलास इनामके, श्री शिरीष फडे,श्री हेमंत रासकर, श्री.संदीप गदादे, आणि श्री. देविदास एकतपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


 संस्थेचे सचिव गणेश कुलकर्णी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून उपस्थितांना संस्थेच्या प्रगतीची सविस्तर माहिती दिली.ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या अजितदादा पतसंस्थेने यंदाच्या वर्षी ही आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे:

भाग भांडवल: ₹६ लाख २८ हजार ४५०

एकूण ठेवी: ₹२ कोटी २९ लाख ८३ हजार

खेळते भांडवल: ₹२ कोटी ९१ लाख

वार्षिक उलाढाल: ₹११ कोटी ६३ लाख

कर्जवाटप: ₹१ कोटी ६० लाख

नफा: तरतूदपूर्व नफा ₹४ लाख ९० हजार, तर निव्वळ नफा ₹३ लाख ९० हजार


संस्थेच्या आर्थिक शिस्तीचे आणि पारदर्शक कारभाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचा निव्वळ एनपीए (NPA) ०% (शून्य टक्के) राहिला आहे. यामुळेच सहकार क्षेत्रातील सर्वोच्च मानांकन असलेला 'अ' ऑडिट वर्ग संस्थेला सलग प्राप्त झाला आहे. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद लायक सय्यद व  संजय नेवसे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. संस्थेची उत्तरोत्तर होणारी प्रगती, ठेवीदारांचा विश्वास आणि संचालकांचे योग्य नियोजन यामुळेच संस्था यशाच्या शिखरावर पोहोचली असल्याचे चेअरमन अरुण मदने यांनी सांगत सर्व सभासदांचे आभार मानले.


सभेच्या शेवटी संस्थेचे सचिव गणेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.