Breaking

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

सासवड माळी एज्युकेशन सोसायटीवर 'स्वाभिमानी पॅनल'चा गुलाल; ११ पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवत 'नवपर्वा'चा प्रारंभ!


सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या सन २०२६-२७ ते २०२८-२९ या कालावधीसाठी पार पडलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पॅनल ने ११ पैकी तब्बल १० जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या एकतर्फी लढतीत प्रतिस्पर्धी जयशंकर पॅनल ला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या ऐतिहासिक विजयामुळे संस्थेच्या कारभारात नव्या पर्वाला सुरुवात झाली असून सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


दि. मॉडेल विविधांगी प्रशालेत रविवारी (ता. ४) पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण १,०२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ५१ पुरुष आणि १५ महिलांची मते बाद ठरली. सायंकाळी ६:३० वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री १०:३० वाजेपर्यंत चालली. सुरुवातीपासूनच स्वाभिमानी पॅनलच्या उमेदवारांनी घेतलेली भक्कम आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

विजयी उमेदवारांची नावे आणि मिळालेली मते स्वाभिमानी पॅनल 

  मंजुषा झगडे – ५७६ मते

  डॉ. अविनाश जाधव – ५७५ मते

  केतन बोरावके – ५७० मते

  स्नेहा गिरमे – ५६८ मते

 कल्पेश पांढरे – ५६७ मते

 विक्रांत कुदळे – ५५७ मते

 रत्नदीप बोरावके – ५४३ मते

 रोहित गिरमे – ५१४ मते

  प्रीतम राऊत – ५११ मते

 अजय गिरमे – ४९७ मते


जयशंकर पॅनल (विजयी १ उमेदवार):

 आकाश राऊत – ४७० मते 


निवडणूक निर्णय अधिकारी अँड.रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला. संस्थेचे चेअरमन मोहन लांडे यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभासदांनी 'स्वाभिमानी पॅनल'च्या बाजूने दिलेला हा स्पष्ट कौल म्हणजे संस्थेतील बदलत्या समीकरणांचा मोठा संकेत मानला जात आहे. पारदर्शक कारभार, शैक्षणिक क्षेत्राचा विस्तार आणि संस्थेचा सर्वांगीण विकास या मुख्य मुद्द्यांवर सभासदांनी नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.