Breaking

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

उत्तमराव जानकर साहेब आमदार व्हावेत प्रतिज्ञेची पूर्तता विश्वासाचा विजय!

माळशिरस:विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांचे कट्टर समर्थक आणि लढाऊ कार्यकर्ते साजिद सय्यद यांनी सोळा वर्षांपूर्वी एक प्रतिज्ञा केली होती जोपर्यंत उत्तमराव जानकर आमदार होत नाहीत,तोपर्यंत मी मांसाहार सुरू करणार नाही ती प्रतिज्ञा पूर्ण झाली आमदार साहेबांच्या उपस्थितीत साजिदभाईंनी मांसाहार सुरू करत आपल्या शब्दाला सत्यात उतरवले आमदार साहेबांनी  स्वतःच्या हस्ते त्यांना घास भरवला तो भावनिक क्षण अधिक संस्मरणीय बनला कार्यकर्त्यांचा असा निस्सीम विश्वास आणि प्रेम हाच आमदार उत्तमराव जानकर यांचे खरे बळ आहे.

याप्रसंगी मंगळवेढ्याचे प्रसिद्ध उद्योगपती वैभव नागणे,माळशिरस तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश शेटे , ऍड.वजीर शेख, ऍड. अविनाश काले, नंदकुमार केंगार, अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष-सुरेश गंभीरे, माजी जिल्हा परिषद सदस्य- अशोकराव गायकवाड,पत्रकार  नौशाद मुलाणी,हुसेन मुलाणी, अमीर मोहोळकर, पंचायत समिती माजी सदस्य अजय सकट,सोमनाथ हुलगे, एजाजखान पठाण, जाकीर खान पठाण,जुल्करैन शेख, अब्बास  शेख, हमीद मुलाणी, संजय पाड़ोळे,राजेश गायकवाड, जावेदभाई बागवान, भैय्या  माढेकर, कासिम तांबोळी, हमीद मुलाणी,तानाजी शिंदे, संजय कोळेकर, सलीम तांबोळी, संजय दळवी,अमोल पानासे, आधी  मान्यवर उपस्थित होते.