Breaking

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा साखर वाटप शुभारंभ युवा नेते विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न

सदाशिवनगर : माळशिरस तालुक्यातील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर येथील कारखाना स्थळावर साखर वाटप शुभारंभ युवा नेते विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित कारखान्याचे संचालक कुमार पाटील,कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख,अभिजीत डुबल,शेतकी अधिकारी गायकवाड, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. कारखान्या  मार्फत दिवाळी निमित्त ऊस पुरवठा करणारे सभासद /बिगर सभासद व ऊस पुरवठा न केलेल्या सभासदांना प्रति किलो रु 18/- रु या दराने आज दिनांक 14/10/2025 पासून साखर वाटप चालु केले आहे.


1)ऊस पुरवठा करणारे सभासद उधारीने 10 किलो

2)ऊस पुरवठा करणारे बिगर सभासद उधारीने 7.5 किलो

3)ऊस पुरवठा न करणारे सभासद यांना रोखीने 5 किलो

सर्व सभासद व ऊस पुरवठा करणारे बिगर सभासद यांनी आपली साखर दिपावली सणासाठी घेऊन जावे कसे आव्हान करण्यात आले.