Breaking

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

हिवाळी अधिवेशनात उत्तमराव जानकर यांना तालिकाध्यक्षपदाचा मान!


नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात उत्तमराव जानकर यांना विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून काम करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटातर्फे त्यांचा  सत्कार करण्यात आला आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. ​पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि पक्षाचे अन्य विधानसभा सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला. 

उत्तमराव जानकर यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करत, पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ​प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे,आमदार जयंत पाटील ,​आमदार रोहित पवार,आमदार बापूसाहेब पठारे,​आमदार नारायणआबा पाटील,​आमदार अभिजीतआबा पाटील,आमदार रोहित पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.