Breaking

रविवार, १८ जानेवारी, २०२६

छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४५ वा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा


स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४५ व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक अक्काताई माने यांच्या निवासस्थानी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार  पडला.

​कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी अक्काताई माने यांनी नवीन घेतलेल्या पखवाजाचे पूजन हरिभक्त परायण भजनदास मिसाळ , उत्तमराव माने आणि अक्काताई माने यांच्या शुभ हस्ते  करण्यात आले.

राज्याभिषेक दिनानिमित्त मुक्ताई भजनी मंडळ, अकलूज यांच्या वतीने विशेष 'संगीत भजन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भजनी मंडळातील महिलांनी आपल्या सुश्राव्य गायनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. 

भजनाच्या या कार्यक्रमात ​कल्पना मिसाळ, उर्मिला दुपडे, शीला पताळे, हेमलता सांगडे,​जया मिसाळ, मनीषा मिसाळ, शितल नागटिळक, सविता शेंडगे,यांसह अनेक महिला भाविकांनी सहभाग नोंदवला.

​याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांच्या देदिप्यमान इतिहासाचा आणि त्यांच्या महान कार्याचा आढावा घेण्यात आला. तरुण पिढीने महाराजांचा संघर्ष आणि निष्ठा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असा सूर यावेळी उमटला.​कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित सर्व महिलांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रावरील पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांचा हळदी-कुंकू समारंभ करून त्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले.

या सोहळ्यासाठी अक्षदा माने यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास हरिदास चव्हाण (वाघोली), रहीम मुलाणी (वेळापूर) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. भजन दास मिसाळ आणि शितल नागटिळक यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.