Breaking

शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेची चित्रकला परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी; २८ विद्यार्थिनींना 'अ' श्रेणी

कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर च्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून तब्बल २८ विद्यार्थिनींनी अ श्रेणी मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ​यावर्षी एलिमेंटरी परीक्षेसाठी ३७ आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३७ अशा एकूण ७४ विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या.

एलिमेंटरी ग्रेड परीक्षा (अ श्रेणी) तृप्ती काळे, अनुप्रिया गाडे, अनुष्का खुडे, दामिनी यादव, जानवी जगदाळे, निशिगंधा तोरसकर, नियती खुडे, परिणीती कोयले, ऋतुजा कांबळे, समृद्धी ठवरे, समृद्धी करगळ, शांभवी चव्हाण, श्रद्धा राऊत आणि तेजल लोखंडे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा (अ श्रेणी)आरती ननवरे, अहिल्या काळे, ऐश्वर्या काळे, अंजली खरात, अनुष्का कोकाटे, अयोध्या मदने, भावना रणदिवे, दिया माने, रुद्राक्षी काळे, सई रणनवरे, तेजश्री ननवरे, वैष्णवी सुळे, विद्या माने आणि विशाखा बुरुटे.

यशस्वी सर्व विद्यार्थिनींना प्रशालेत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक  जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे,खराडे साहेब तसेच प्रशाला समितीचे सर्व सदस्य आणि मुख्याध्यापिका अनिता पवार मॅडम यांनी विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले.

या सर्व विद्यार्थिनींना प्रशालेचे चित्रकला शिक्षक विशाल लिके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कला क्षेत्रात प्रशालेच्या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशामुळे यशवंतनगर व अकलूज परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.