पुणे: महंमदवाडी आणि हडपसर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण २ लाख ८३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गंगेश्वर यादव (रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी) यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी वैभव उर्फ बाब्या संजय गायकवाड, (रा. साठे नगर, तरवडे वस्ती, पुणे) व प्रशांत उर्फ चिक्या भारत कसबे (रा. साठे नगर, तरवडे वस्ती, पुणे) यांना ताब्यात घेऊन तपास केला असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या आरोपींनी सखोल चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:
सोन्याचे दागिने: १५.९ ग्रॅम (किंमत अंदाजे ₹ २,१८,८९०/-)
चांदीचे दागिने: २२०.६ ग्रॅम (किंमत अंदाजे ₹ ६१,७४०/-)
इतर: ओपो कंपनीचा मोबाईल (किंमत ₹ ३,०००/-)
जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे हार, चैन, टॉप्स, मणी तसेच चांदीचे पैंजण, अंगठ्या आणि साखळी यांचा समावेश आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग (अति. कार्य) यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे स.पो.नि. अमित शेटे, पो.उप.नि. विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, प्रतिक लाहिगुडे, दाऊद सय्यद, पंकज गाडे पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, महादेव शिंदे, नितीन ढोले, प्रदिप बेडिस्कर, सद्दाम तांबोळी, गिरीराज जगदाळे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

