मोहोळ तालुक्यातील संघटनेची धुरा खालील पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे शहराध्यक्ष पद्माकर सोनटक्के,उपाध्यक्ष सचिन दळवी,सचिव नानासाहेब ननवरे,खजिनदार तेजस तिकुटे,प्रसिद्धी प्रमुख सुहास परदेशी,सहसचिव राहुल सोनवणे,संघटक सचिन गवळी, या विशेष कार्यक्रमाला मंगळवेढा तालुकाध्यक्ष रोहिदास भोरकडे, जिल्हा कोर कमिटी सदस्य तथा पंढरपूर खजिनदार समाधान वनसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलास रणदिवे, बालाजी शेळके, मोहोळ तालुकाध्यक्ष विजय पुजारी यांच्यासह तालुक्यातील अनेक अनुभवी पत्रकारांनी उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे व अन्य मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आणि भविष्यातील कार्यावर सखोल चर्चा केली. पत्रकारांच्या हितासाठी आणि संघटनेच्या मजबुतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी तालुका कार्यकारिणी सदस्य भैय्यासाहेब कांबळे, दत्ता मिसाळ, दिनेश सातपुते, अशोक कांबळे, दत्तात्रय पांढरे, गोरक्ष गायकवाड यांच्यासह मोहोळ तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


