Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

अकलूज पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; विविध क्षेत्रांतील महिलांचा फेटा बांधून सन्मान


अकलूज (प्रतिनिधी):जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकलूज पोलीस ठाणे येथे आज, ८ मार्च रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत महिलांच्या सन्मानार्थ एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा  रेश्माताई आडगळे यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांची प्रमुख उपस्थिती होती.​कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवर महिलांचा पारंपरिक फेटा बांधून सन्मान करण्यात आला. केवळ पुष्पगुच्छ न देता, पर्यावरणाचा संदेश जपत महिलांना फुलांचे झाड (रोपटे) देऊन गौरविण्यात आले. पोलिसांच्या या आपुलकीच्या उपक्रमाने उपस्थित महिला भारावून गेल्या होत्या.

​यावेळी आयोजित संवाद सत्रात महिला नगरसेवक, पोलीस पाटील, महिला होमगार्ड, तसेच महिला दक्षता समितीतील डॉक्टर, वकील, शिक्षक आणि समाजसेविका यांनी आपले विचार मांडले.विविध पदांवर काम करताना येणारे अनुभव महिलांनी शेअर केले.महिलांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडीअडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न आणि त्यावर प्रभावी उपाययोजना कशा असाव्यात, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याची मदत आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन महिलांनी अधिक सक्षम कसे व्हावे, यावर चर्चा करण्यात आली.

​या कार्यक्रमास अकलूज पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.