सदाशिवनगर: सदाशिवनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आर पी आय चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या मातोश्री सुमन नारायण भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच, सदाशिवनगर तंटामुक्त अध्यक्ष पदी सोमनाथ कैलास भोसले यांचा निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
मोहिते-पाटील यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि गावाच्या विकासासाठी चांगले कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.यावेळी ग्रामपंचायत सरपंच,सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


