प्रतिनिधी...महेश पांडवे
मो.9511875416
माळशिरस: शेतकरी, कामगार, तरुण आणि महिला या सर्व घटकांचा आवाज ज्या भूमीतून बुलंद होत असतो, त्या माळशिरस तालुक्यात आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील जनतेच्या नजरा एका नावावर खिळल्या आहेत, गेल्या काही वर्षांत मा.आमदार राम सातपुते यांनी केवळ राजकारण नव्हे, तर माळशिरस तालुक्याच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या कामाचा आणि जनसंपर्काचा मजबूत पाया असल्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कामगिरी कशी असेल याबद्दल मोठी उत्सुकता आहे.
आमदार सातपुते यांनी तालुक्यातील अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लावले आहेत. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या नीरा-देवधर योजनेचा पाठपुरावा असेल, माचणूर उपविभागाचा पाणीवाटपाचा विषय असेल किंवा शेतीसाठी लागणारे विजेचे डिपी जळालेनंतर ते तत्काळ बसवून देणे ही कामे त्यांनी तत्परतेने केली आहेत.यासोबतच, तालुक्यात रस्त्यांचे डांबरीकरण, गावगाड्यातील अंतर्गत रस्ते आणि महापुरुष, संत यांच्या स्मारकांची कामे अशा अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांचा धडाका त्यांनी लावला आहे.
विकासकामांबरोबरच आमदार रामभाऊ सातपुते यांचा जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी देखील वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी गरजू लोकांची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करुन देणे आणि जनतेच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणे यामुळे त्यांच्याविषयी जनतेत एक विश्वासाचे आणि आपलेपणाचे वातावरण निर्माण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

