दि सासवड माळी कारखान्याने ऊस उत्पादकांना दिलेला शब्द कारखाना प्रशासनाने पाळल्यामुळे, ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनाचे उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे, हा कारखाना ऊस उत्पादकांना वेळोवेळी ऍडव्हान्स देत असतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आर्थिक मदत मिळत असते.
शासकीय अनुदानाशिवाय वाटचाल करणारे दुर्मिळ उदाहरण सहकारी साखर कारखाने बऱ्याचदा राज्य व केंद्र शासनाच्या अनुदानावर अवलंबून असतात. मात्र, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी हा खासगी साखर कारखाना शतकोत्तर वाटचालीच्या उंबरठ्यावर असून,या कारखान्याला कोणतेही शासकीय अनुदान किंवा सवलत नाही.शेतकरी सभासद हेच आमचे मोठे भांडवल आणि आधार आहे,या दृढ विश्वासावर हा कारखाना शून्यातून उभा राहिला आणि यशस्वी वाटचाल करत आहे. व्यवस्थापनाची सकारात्मक भूमिका, सभासदांचा विश्वास,अढळ श्रद्धा आणि संचालक मंडळ यामुळे अनेक आर्थिक आणि तांत्रिक अडचणींवर मात करून कारखाना सुरळीत सुरू आहे.
केवळ पुर्ण काटकसरीचे धोरण आणि शेतकऱ्यांवरील विश्वासाच्या बळावर हा खासगी कारखाना देशातील साखर उद्योगात एक दुर्मिळ व एकमेव आदर्श म्हणून ओळखला जात आहे. याच बळावर माळीनगर कारखान्याची यशस्वी वाटचाल पुढेही अव्याहतपणे चालू आहे.

