Breaking

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर येथे ५३ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ उत्साहात संपन्न!

सदाशिवनगर: श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगरच्या ५३ व्या बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते - पाटील आणि सौ. नंदिनीदेवी मोहिते - पाटील यांच्या शुभहस्ते हा समारंभ संपन्न झाला. 


विधानपरिषद आमदार तथा श्री शंकर सहकारीचे चेअरमन  रणजितसिंह मोहिते - पाटील यांची विशेष उपस्थिती होती. समारंभाची सुरुवात सत्यनारायण पूजनाने झाली. कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शोभा वाघमोडे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. तसेच, कै. सहकार महर्षी काकासाहेब, आक्कासाहेब व कै. पपा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.


या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन  रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढ आणि दिवाळीसणां निमित्त १५ दिवसांचा पगार बोनस देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,सभासद,कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या सहकार्याने यंदाचा ऊस गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडेल असा मला विश्वास आहे. यंदा ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ८६०३२ या जातीचा ऊस जास्तीत जास्त पुरवठा करण्याचे आवाहन केले आणि त्या ऊसाच्या दराबाबत स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल, असे स्पष्ट केले.


यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे  व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, माजी जि. प. उपाध्यक्ष म शहाजीराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते - पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, सौ. सत्याप्रभादेवी मोहिते - पाटील, सौ. शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह संचालक मंडळातील आप्पासाहेब रूपनवर, मालोजीराजे देशमुख, दत्तुकाका रणनवरे, प्रफुल्ल कुलकर्णी, प्रताप सालगुडे, शिवाजी गोरे, ॲड. सुरेश पाटील, महादेव शिंदे, रामदास कर्ण, कुमार पाटील, सुनिल माने, सचीन लोकरे, सुधाकर पोळ, बाळासाहेब माने, दत्तात्रय मिसाळ, संजय कोरटकर, दत्ता चव्हाण, जगन्नाथ जाधव, विरकुमार दोशी, उदय धाईजे, विलास फडतरे, विलास आद्रट, अभिमान सांवत, शिवाजी जाधव, शिवाराज निबाळकर, दत्ता भोसले, ज्ञानदेव निबाळकर, तुकाराम चव्हाण, भोजराज माने, बिनु पाटील, नाना शेंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हा समारंभ श्री शंकर सहकारीचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, डुबल साहेब, ॲड. नितिन खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, शेतकरी सभासद, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.