Breaking

सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या इंदापूर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तयारीला वेग, इच्छुकांची भाऊगर्दी

 

इंदापूर प्रतिनीधी 

इंदापूर: इंदापूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. पक्षाकडे इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून, निमसाखर येथे झालेल्या बैठकीत अनेक उमेदवारांनी जिल्हाप्रमुख संजय काळे आणि तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागणी अर्ज सादर केले आहेत.

जिल्हा परिषद गट: भिगवण-शेटफळ गढे गटातून ॲड. राहुल बंडगर यांच्या मातोश्री शशिकला बंडगर, वडापुरी-माळवाडी गटातून सचिन इंगळे, निमगाव केतकी-शेळगाव गटातून प्रज्ञा कदम (ॲड. नितीन कदम यांच्या पत्नी) आणि स्वाती अडसूळ (अरविंद अडसूळ यांच्या पत्नी, वालचंदनगर-बोरी गटातून शिला खुडे (दत्ता खुडे यांच्या पत्नी सणसर-लासुर्णे गटातून शोभा सूर्यवंशी (अरविंद सूर्यवंशी) यांच्या पत्नी), काटी-लाखेवाडी गटातून तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी स्वत तर बावडा-लुमेवाडी गटातून मनीषा पवार (अरुण पवार यांच्या पत्नी) यांनी अर्ज सादर केले आहेत.

पंचायत समिती गण:भिगवण, शेटफळ गढे, पळसदेव, वडापुरी, निमगाव केतकी, शेळगाव, बोरी, वालचंदनगर, लासुर्णे, सणसर, काटी, लाखेवाडी आणि लुमेवाडी या गणांसाठीही अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांच्या पत्नी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

  सर्व इच्छुकांच्या मुलाखती रविवार, २६ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे होणार आहेत.मुलाखतीनंतर अंतिम इच्छुकांची यादी शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाप्रमुख संजय काळे व तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिली.