Breaking

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर; बबनराव धायतोंडे अध्यक्ष, दत्ता पारेकर उपाध्यक्षपदी



इंदापूर: इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, यामध्ये बबनराव धायतोंडे यांची अध्यक्षपदी, तर दत्तात्रेय पारेकर यांची उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे. इंदापूर येथील रेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या निवड सभेत ही कार्यकारिणी निवडण्यात आली.

सत्यजित रणवरे आणि शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. तसेच सचिवपदी दत्तात्रेय मिसाळ, खजिनदारपदी अरुण भोई, कार्याध्यक्षपदी अतुल सोनकांबळे व धनाजी शेंडगे, सहखजिनदारपदी महेश कळसाईत, तर प्रसिद्धी प्रमुखपदी प्रवीण पिसे यांची निवड करण्यात आली.

यावेळी सत्यजित रणवरे आणि शिवाजी पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले. पत्रकार बांधवांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक भान राखणाऱ्या पत्रकारितेसाठी संघ एकजुटीने कार्य करेल, असा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.

निवड कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.