विशेष प्रतिनिधी... गणेश साठे
अकलूज: कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घोडे बाजाराचे उद्घाटन आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व तसेच ज्येष्ठ नेते जयसिंह (बाळदादा) मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी घोडे बाजाराच्या आयोजनाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभिनंदन केले. या घोडे बाजारामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापारी यांना आपल्याच भागात सोयीचे ठिकाण उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे या व्यवसायाला मोठा हातभार लागणार आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या व्यवसायाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मदनसिंह मोहिते-पाटील (चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती), आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, मामासाहेब पांढरे, सचिव राजेंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.



