Breaking

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

मोहिते पाटील बंधूंच्या हस्ते अकलूज नगरपरिषदेतील महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन

 


अकलूज नगरपरिषद हद्दीमध्ये केंद्र शासनाच्या 'अमृत 2.0' योजनेअंतर्गत आणि 'सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियाना'अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.यामुळे अकलूज शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला आणि रस्ते विकासाला नवी दिशा मिळणार आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेतून अकलूज शहरासाठी पाणीपुरवठा योजनेकरिता ₹211.54 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पाईप लाईनचे काम वेगाने सुरू असून,शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व नियमित करण्यासाठी ५ नवीन पाणीटाक्यांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यामुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. शहरातील दळणवळण अधिक सुरळीत व्हावे यासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत रस्ते बांधकामासाठी ₹120 कोटी रुपयांच्या कामाचे पहिल्या टप्प्यातील चार प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजनही या प्रसंगी संपन्न झाले.


या सर्व महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.


यावेळी किशोरसिंह माने पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, क्रांतिसिंह माने पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांच्यासह अकलूज शहरातील आजी-माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.