करमाळा: सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतील 'पहाट' या उपक्रमांतर्गत 'आदिवासी पारधी वस्तीमध्ये सौर ऊर्जा दिवा (हायमस्ट) बसविणे' या योजनेचा भूमिपूजन समारंभ आज, रविवार दिनांक 26/10/2025 रोजी करमाळा तालुक्यातील मौजे वरकटणे येथे संपन्न झाला.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक, करमाळा उपविभाग अंजना कृष्णा (भा.पो. से.), करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने , प्रकल्प कार्यालय सोलापूरचे विशाल सरतापे,आणि प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे माजी सदस्य मनोज काळे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
तसेच मौजे पारेवाडी येथे करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने , प्रकल्प कार्यालय सोलापूरचे विशाल सरतापे आणि आदिवासी पारधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नटवरलाल काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. 'पहाट' उपक्रमामुळे आदिवासी वस्तीमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



