अकलूज (प्रतिनिधी): भारताचे लोहपुरुष आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने 'रन फॉर युनिटी , एकता दौडचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ही मिनी मॅरेथॉन रॅली अकलूज शहरातून उत्साहात पार पडली.
सकाळी ठीक ७ वाजल्यापासून या एकता दौडचा प्रारंभ विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल, अकलूज येथून झाला. या रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहात धावले. क्रीडा संकुलातून निघालेली ही दौड महर्षी चौक, सदुभाऊ चौक, प्रतापसिंह चौक मार्गे अकलूज पोलीस स्टेशन येथे येऊन पोहोचली आणि तिची सांगता झाली.
या महत्त्वपूर्ण रॅलीचे यशस्वी आयोजन अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपस्थितांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन करत 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चा संदेश दिला.


.jpg)
