Breaking

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक

 


मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक  मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने कोणती रणनीती अवलंबायची, यावर सखोल चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील पक्ष संघटनेच्या सध्याच्या कार्याचा आढावा घेतला आणि संघटना अधिक बळकट करण्याच्या दिशेने मार्गदर्शन केले. पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, पक्षाचे ध्येय-धोरणे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर दिला आणि जनसामान्यांशी संवाद वाढवण्याचे आवाहन केले. बैठकीत उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील राजकीय स्थितीची माहिती दिली आणि निवडणुकीच्या तयारीबाबतच्या सूचना मांडल्या.