प्रतिनिधी.. महादेव मोहिते
इंदापूर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशानुसार, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यास इंदापूर पोलिसांना सांगण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत इंदापूर पोलिसांनी दिनांक १७/११/२०२५ रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पो. निरीक्षक विलास नाळे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.आरोपी स्वप्नील फकीर भोई (वय २२ वर्षे, रा. कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे) चौकशीदरम्यान,आरोपीकडून एकूण ५५,०००/- रु. किंमतीचे मॅगझीनसह एक गावठी अग्नीशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.आरोपी स्वप्नील भोई याचा साथीदार म्हणून रणजित नवनाथ शिंदे (रा. कळाशी) याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पो. उपनिरीक्षक अजित बिरादार व त्यांचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पो.अधीक्षक संदीपसिंह गिल,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये पो. निरीक्षक विलास नाळे आणि पो. उपनिरीक्षक अजित बिरादार यांच्यासह पो.हवालदार सलमान खान, पो.कॉ. लक्ष्मण सुर्यवंशी, तुषार चव्हाण, अंकुश माने, गणेश डेरे, विनोद लोखंडे, सुरज गुंजाळ, योगेश कर्चे व नंदु जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

