अकलूज: अकलूज नगर परिषदेच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या अधिकृत उमेदवार श्रीमती नम्रता जगताप यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात झंझावाती आघाडी घेतली आहे.त्यांनी आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचाराची एक फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली असून,मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे...
प्रभाग क्रमांक ०३ हा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.यामध्ये पंचवटी,मसूद मळा सह अकलूज शहरातील बहुतांश भागाचा समावेश आहे.या सर्व भागांमध्ये नम्रता जगताप यांनी घेतलेल्या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले आणि त्यांना प्रचंड असा पाठिंबा दर्शवला.
या प्रचार दौऱ्या दरम्यान सिद्धेश्वर जगताप,नाझीम खान,नाझीम सय्यद,वैष्णवी रिसवडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व कार्यकर्त्यांच्या नियोजित प्रयत्नांमुळे आणि नम्रता जगताप यांच्या थेट जनसंपर्कामुळे प्रभाग क्रमांक ०३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून,निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होताना दिसत आहे...

