उमेदवार नम्रता जगताप आणि विशाल मोरे यांनी प्रचारात घेतली आघाडी...
आमीर मोहोळकर
महाराष्ट्र नगरी,अकलूज
9890299499
अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू असून याच अनुषंगाने महादेव नगर येथे आज संध्याकाळी एका महत्त्वपूर्ण कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार नम्रता जगताप आणि विशाल मोरे यांच्या प्रचारा निमित्त सदर कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती...
तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणातून महादेव नगरमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर पाढा वाचला,मोहिते पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की,येणाऱ्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत वरील दोन्ही उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या "तुतारी" समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.
इतर नेत्यांची दमदार भाषणेया वेळी ॲड. अविनाश काले,मुख्तार कोरबु आणि ॲड रणजीत भोसले यांची देखील दमदार आणि प्रभावी भाषणे झाली.या वक्त्यांनी विकासाचे मुद्दे आणि आगामी काळातील योजना नागरिकांसमोर मांडल्या अकलूज नगर परिषदेच्या 'नगराध्यक्षा' पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या उमेदवार सौ. रेश्मा लालासाहेब अडगळे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
एकूणच,महादेव नगर येथील या कॉर्नर सभेने राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली या वेळी नाझीम खान,नाझीम सय्यद,दिपक शिंदे,सूरज बागाव,सुहास रणदिवे,वैष्णवी रिसवडकर यांच्या सह महादेव नगर येथील असंख्य महिला आणि पुरुष मतदार उपस्थित होते...


