मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज (मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. महा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज दुपारी ४.०० वाजता मुंबईतील सचिवालय, जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोषणेनंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि प्रशासनाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५
आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता!
About मुख्य संपादक रियाज मुलाणी
संपर्क 9921500780 .
मुंबई
लेबल:
मुंबई

