विशेष प्रतिनिधी- महादेव मोहिते
इंदापूर :बावडा -नरसिंहपुर रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असुन सदर मार्ग हा जास्त रहदारी चा आहे या मार्गावरील शिंदेवस्ती गणेशवाडी ,पिंपरी,टणु, नरसिंहपुर या रस्त्यावर धोकादायक वळणावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे काटेरी झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाहीत. येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूची काटेरी झुडपे त्वरित काढून टाकावीत,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.बीकेबीएन या रस्त्याचे काम चार पाच वर्षांपूर्वी पुर्ण झाले आहे.परंतु सदर काम करणारे ठेकेदार आणी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अद्यापपर्यंत एकदाही देखभाल दुरुस्ती केली नाही.
वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहने रस्त्याच्या कडेला उभे करणे जिकिरीचे ठरू लागले आहे.अनेक वेळा भरधाव आलेले वाहन चुकविताना या झुडपांचा मार प्रवाशांना सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ही काटेरी झुडपे तोडावीत,अशी मागणी टणु ग्रामपंचायत सरपंच तेजस मोहिते यांनी केली आहे.बावडा ते नरसिंहपुर दरम्यान रस्त्याच्या बाजूला उगवलेल्या काटेरी झाडा झुडपांमुळे धोकादायक वळण लक्षात येत नाही.त्यामुळे येथे छोटे मोठे अपघात होत आहेत.तसेच विविध ठिकाणी उपरस्ते या रस्त्याला येऊन मिळतात त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत.व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित ही झाडे झुडपे काढून टाकावीत. ही तेथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.


