Breaking

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची तांबवे येथे 'जिजाऊ फार्म हाऊस'वर सदिच्छा भेट


​तांबवे:सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी डेप्युटी इंजिनिअर आणि मराठा सेवा संघाचे राज्य संघटक उत्तमराव माने यांच्या तांबवे येथील 'जिजाऊ फार्म हाऊस' येथे शनिवारी, २० डिसेंबर रोजी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

​खासदार मोहिते पाटील यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि सहकार महर्षी कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि स्थानिक विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.

या स्नेहभोजन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ​सेवानिवृत्त डीवायएसपी विठ्ठलराव लेंगरे,​मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष इंजि. संजय देसाई व हेमलता देसाई,​रवींद्र पाटील, आशिष खराडे, मोहनराव रेळेकर,​भगवानराव वाघोले, शिवाजीराव लोंढे, विराज निंबाळकर, सुदर्शन हंबीरे,​मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, सुहास उरवणे, गुजर सर ,​डॉ. विश्वास कदम, डॉ. प्रिया कदम, डॉ. प्रशांत निंबाळकर, डॉ. स्वाती निंबाळकर आणि विश्वनाथ आव्हाड ​यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माने परिवाराने विशेष परिश्रम घेतले. डॉ. अमोल माने, अजित माने, गिरीश माने, सुनील माने, मुंबई विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक अनिल माने, उमेश माने, निलेश शेंडगे, सुतगिरणीचे संचालक मोहनराव शेंडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक अक्काताई उत्तमराव माने, योगेश माने, निलेश माने आणि गणेश माने यांनी पाहुण्यांचे स्वागत व व्यवस्थापन चोख ठेवले.