Breaking

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

अकलूजमध्ये पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके आणि माने कुटुंबीयांची स्नेहभेट


पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांनी नुकतीच अकलूज-माळेवाडी येथील 'शिवमोल' निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माने कुटुंबीय आणि उपस्थितांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. ही भेट जुन्या आठवणींना उजाळा देणारी ठरली,​माने कुटुंबाकडून जंगी सत्कार ​डॉ. प्रणिता भालके यांचे 'शिवमोल' निवासस्थानी आगमन होताच माने परिवाराच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अजित माने, अक्षता माने, आरवी आणि उर्वी अजित माने तसेच हेमलता सांगडे यांनी डॉ. भालके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन  यथोचित सन्मान केला.

भगीरथ भालके व अजित उत्तमराव माने हे सदाशिवराव माने विद्यालय येथे एका वर्गात शिकत होते ​यावेळी बोलताना डॉ. प्रणिता भालके भावूक झाल्या होत्या स्व.लोकनेते भारतनाना भालके जेव्हा जेव्हा अकलूज दौऱ्यावर येत असत, तेव्हा ते न चुकता माने कुटुंबाच्या या निवासस्थानी भेट देत असत,अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.नानांचे माने कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आजही कायम असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते​अयोध्या ज्वेलर्सचे नवनाथ नागणे,​सुनील पाटील,​मनीष गायकवाड,​महेश झिंगे,​सागर मिसाळ व निकिता मिसाळ,​शिवाजीराव पवार,​मिलिंद कोथमीरे,​उपस्थित सर्वच मान्यवरांनी पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांचा सन्मान केला.