Breaking

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

माळीनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रितेश पांढरे; सचिवपदी गोपाळ लावंड यांची फेरनिवड

माळीनगर पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी दैनिक 'पुण्यनगरी'चे प्रतिनिधी रितेश पांढरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच, सचिव म्हणून गोपाळ लावंड यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवत त्यांची पुनश्च निवड करण्यात आली.​पत्रकार संघाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली संघाची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघाच्या विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष गणेश करडे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी रितेश पांढरे यांची आगामी दोन वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.​नूतन अध्यक्ष रितेश पांढरे हे गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून,त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा पत्रकार संघाला होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष गणेश करडे आणि सदस्य प्रदीप बोरावके प्रामुख्याने उपस्थित होते.

या निवडीचे वृत्त समजताच माळीनगर मधील राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यामध्ये प्रामुख्याने ​सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके व संचालक मंडळ,​शुगरकेन सोसायटी चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, व्हा. चेअरमन नितीन इनामके, सेक्रेटरी अजय गिरमे, महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे, सचिव योगेश कचरे, माळीनगर मल्टीस्टेटचे चेअरमन अमोल गिरमे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर व्यवहारे,गहिनीनाथ अर्बन बँकेचे चेअरमन शिरीष फडे,दि मॉडेल हायस्कूलचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार,यांसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पांढरे व लावंड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.