Breaking

शनिवार, १० जानेवारी, २०२६

​दु:खाच्या डोंगरावर माणुसकीचा आधार: कै. प्रताप मोहिते यांच्या परिवाराला ४.३० लाखांची मदत


​संग्रामनगर प्रतिनिधी, संजय लोहकरे


इंदापूर तालुक्यातील टणू येथील रहिवासी आणि एस.बी. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजचे लॅब असिस्टंट कै. प्रताप पोपट मोहिते यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या दु:खाच्या प्रसंगी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेच्या वतीने आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून जमा झालेली ४ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक मदत नुकतीच मोहिते परिवाराकडे सुपूर्द करण्यात आली.

प्रताप मोहिते हे एस.बी. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे ते सर्वत्र परिचीत होते.मात्र,नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाविद्यालयावर शोककळा पसरली असून, एका प्रामाणिक कर्मचाऱ्याला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

​माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि संस्थेच्या उपाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मोहिते परिवाराला मदत करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत ४,३०,०००/- रुपये जमा झाले. ही मदत देण्यासाठी अंकिता पाटील ठाकरे यांनी स्वतः टणू येथे मोहिते कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले ​कै. प्रताप मोहिते यांच्या पश्चात पत्नी तनुजा पाटील ,अमरदीप (इयत्ता ९ वी) व अशितोष (इयत्ता ७ वी) ही दोन मुले असा परिवार आहे. ही दोन्ही मुले महर्षी प्रशाला, शंकरनगर येथे शिक्षण घेत आहेत. पाटील परिवाराने या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले  आहे.