संग्रामनगर प्रतिनिधी - केदार लोहकरे
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ५ लाख २५ हजाराव्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक विराज प्रकाश निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच को-जन वीज निर्मिती प्रकल्पामधून महावितरण कंपनीस विक्री करण्यात आलेल्या २ कोटी ८५ लाख वीज युनिटचे पूजन संचालक महादेव जालिंदर क्षिरसागर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रगतशील दृष्टीकोनातून कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर सुरू आहे. कारखान्याचा गळीत हंगाम दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झाला असून आजअखेर ५ लाख ९६ हजार १९१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन ५ लाख ४८ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.४३ टक्के इतका मिळाला असून सध्या प्रतिदिन ८,५०० मेट्रिक टन ऊस गाळप होत आहे. को-जन वीज निर्मिती प्रकल्प २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाला असून ८ जानेवारी २०२६ अखेर ४ कोटी ६८ लाख ५८ हजार ०६० युनिट वीज निर्मिती झाली आहे. यापैकी २ कोटी ८६ लाख २७ हजार ८०० युनिट वीज महावितरण कंपनीस विक्री करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, रावसाहेब पराडे, डॉ. सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख, शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमीडिया लेझर शो कमिटीचे सदस्य विनायक केचे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ. हर्षाली निंबाळकर, तसेच माजी संचालक भीमराव काळे, भारत फुले, मोहनराव लोंढे, रामचंद्र चव्हाण, राजेंद्र मोहिते, धनंजय चव्हाण, चांगदेव घोगरे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.


