अकलूज / प्रतिनिधी : पत्रकार दिनाचे औचित्य साधून अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात दि. ४ जानेवारी २०२५ रोजी व्हॉईस ऑफ मिडिया इंटरनॅशनल फोरम या देशव्यापी पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
५८ देशांमध्ये कार्यरत असलेल्या व पत्रकारांच्या हक्क, न्याय आणि सुरक्षिततेसाठी सातत्याने लढा देणाऱ्या या क्रांतिकारी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर तसेच सोलापूर जिल्हा कोअर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थान नूतन माळशिरस तालुका अध्यक्ष पत्रकार अण्णा भोसले यांनी भूषवले.
या बैठकीत माळशिरस तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सर्व उपस्थित पत्रकारांच्या एकमताने व बिनविरोधपणे पत्रकार अण्णा भोसले यांची माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष अण्णा भोसले,तालुका कोअर कमिटी सदस्य शिवराम गायकवाड,तालुका उपाध्यक्ष बिभीषण साठे,तालुका कार्याध्यक्ष तुषार केंगार,तालुका संघटक आमीर मोहोळकर,तालुका खजिनदार अमोल साठे,तालुका सचिव रणजितदादा गायकवाड,तालुका प्रसिद्धीप्रमुख श्रीकृष्ण देशपांडे,सहकार्याध्यक्ष सदानंद बनसोडे यांची निवड करण्यात आली, तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अण्णा भोसले यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेची ताकद तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

