Breaking

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

पुण्यात काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; सराईत वाहनचोर जेरबंद, ४ दुचाकी जप्त


 पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ तपास पथकाने धडाकेबाज कामगिरी करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून चोरीच्या ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत २ लाख ८० हजार रुपये आहे. ​गुप्त बातमीदाराच्या मदतीने सापळा ​काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंढरकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला चोरीच्या गाडीसह ताब्यात घेतले.​


​अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अब्बास ऊर्फ कलिंगड सय्यद पठाण (वय १९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) असे आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने काळेपडळसह लष्कर आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. काळेपडळ स्प्लेंडर प्लस MH 12 NG 4666,  लष्कर स्प्लेंडर MH 12 TE 3317, हडपसर होंडा पॅशन प्रो MH 09 BQ 9281, हडपसर होंडा शाईन MH 10 CC6894

​ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस दलातून पथकाचे कौतुक होत आहे.