शारदा राऊत यांची ओळख केवळ माजी सरपंच म्हणून नव्हे, तर लोकहितकारी सरपंच म्हणून होती. त्यांच्या कार्यकाळात ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली. योजना केवळ कागदावर न ठेवता त्या प्रत्यक्षात उतरवण्यावर त्यांचा भर होता. ग्रामपंचायतीत पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन राबवून सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला,स्वभावाने शांत, संयमी असल्या तरी प्रशासनात त्यांनी कडक शिस्त पाळली गाव माझा परिवार या भावनेतून त्यांनी सत्तेचा वापर लोकसेवेसाठी केला. त्यामुळेच त्या सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकल्या.
त्यांच्या निधनानंतर माळीनगरमधील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. माळीनगरला आधुनिक आणि विकासाभिमुख दृष्टी देणारे नेतृत्व आपण गमावले,अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या पश्चात पती शामराव राऊत, दोन मुले,एक मुलगी, सून,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.शारदा राऊत यांच्या पार्थिवावर आज ठीक ५:०० वाजता माळीनगर येथील वैकुंठ भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
“पदे येतात आणि जातात; पण लोकसेवेचा ठसा जो उमटवतो, तोच जनतेच्या मनात कायम अमर राहतो.”
— भावपूर्ण श्रद्धांजली

