Breaking

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळेगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप


 मुख्य संपादक:रियाज मुलाणी 

मो.9921500780

 कोळेगाव: शिव-कीर्ती युवा मंच शाखा कोळेगाव यांच्या वतीने अकलूज नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील (शिवबाबा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा कोळेगाव येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून बाबांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसृष्टी मल्टीमीडिया लेझर शोचे संचालक  धनंजय (भाऊ) दुपडे आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  नितीन सावंत पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन सावंत पाटील म्हणाले की,​शिवतेजसिंह मोहिते पाटील हे सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे काम करणारे नेतृत्व आहे. अतिशय कमी वयामध्ये त्यांना विविध संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने करत त्यांनी अकलूज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. ​सावंत यांनी शिवबाबांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य लाभो,अशी प्रार्थना केली.

​या ​कार्यक्रमाला पिलीव गावचे युवक सोहेल बागवान, शिवकीर्ती युवा मंच शाखा कोळेगावचे अध्यक्ष सुभाष बंदपट्टे, दत्तात्रय गेजगे, रानोबा पारसे, संतोष धांडोरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कोळेगावमधील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.