Breaking

बुधवार, १ एप्रिल, २०२६

माळीनगरमध्ये उत्सवाचा जल्लोष! १४ दिवस रंगणार 'फुले-आंबेडकर जयंती' सोहळा



​माळीनगर (प्रतिनिधी): क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माळीनगर येथे 'फुले-आंबेडकर संयुक्त मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने यंदा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून सुरू होणारा हा उत्सव १४ एप्रिलपर्यंत चालणार असून, यामध्ये सामाजिक प्रबोधन, आरोग्य शिबिरे आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे.​उत्सवाची सुरुवात बुधवार, १ एप्रिल रोजी 'संगीत खुर्ची' स्पर्धेने होणार आहे. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, लिंबू-चमचा स्पर्धा आणि लहान मुलांसाठी डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर ,१३ एप्रिल रोजी नांदेड येथील नालंदा सांगवीकर व संच  यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून, १३ एप्रिल रोजी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.


​केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत मंडळाने विविध शिबिरांचे आयोजन केले आहे फिजिओथेरपी कॅम्प, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी व सर्व रोग निदान शिबिर, बांधकाम कामगार नोंदणी, रेशनकार्ड कॅम्प,आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणी कॅम्प, प्रा. समाधान काटे  व डॉ. माळी यांचा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, तसेच इंजि. पवन दवंडे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला आहे. ​​११ एप्रिल (महात्मा फुले जयंती): सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सायंकाळी महिलांसाठी खास 'स्टार मिनिस्टर' खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. ​१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती): सकाळी ९ वाजता ध्वजारोहण पार पडेल. सायंकाळी ६ वाजता महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

​​हे सर्व कार्यक्रम रमामाता कॉलनी, जयभीम पटांगण, माळीनगर (ता. माळशिरस) येथे संपन्न होतील. या भव्य आयोजनासाठी फुले-आंबेडकर संयुक्त मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. ​या सर्व कार्यक्रमांना माळीनगर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.