Breaking

रविवार, ५ एप्रिल, २०२६

माळशिरस तालुक्यातील ३९ शिक्षकांचा 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने गौरव


आमदार उत्तम जानकर यांच्या हस्ते सन्मान; गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थी घडवण्याचे आवाहन


​ अकलूज (प्रतिनिधी) : माळशिरस तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षातील तालुकास्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. शंकरनगर येथील स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यात तालुक्यातील एकूण ३९ शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल आमदार उत्तम जानकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ​या कार्यक्रमात १ शिक्षण विस्ताराधिकारी, ७ मुख्याध्यापक आणि ३१ सहशिक्षक अशा एकूण ३९ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर सभापती दत्ता मगर, उपसभापती मनीषा पाटील, जि.प. सदस्य गौतम माने, नागन्नाथ भोसले, सुषमा नारनवर, मीनाक्षी सरतापे, लीलावती ठवरे, तसेच पंचायत समिती सदस्य प्रवीण वाघमोडे, युवराज झंजे, आनंद शेंडगे, महादेव साबळे, आप्पासाहेब पाटील, मनीषा नाईकनवरे, नम्रता पुकळे, रेश्मा माने, स्नेहा जानकर आणि माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, मिलिंद सरतापे, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.


​पुरस्कार वितरणानंतर बोलताना आमदार उत्तम जानकर म्हणाले की, शिक्षक ही गुणवत्तेची खाण असून त्यांचे भाषेवर आणि ज्ञानावर प्रभुत्व असते.शिक्षकांमधील उपजत ज्ञानच आदर्श विद्यार्थी घडवण्याचे सामर्थ्य ठेवते. आजच्या बदलत्या काळात शिक्षकांनी आपल्या अंतर्मनातील ज्ञानाचा झरा वाहू द्यावा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पिढी घडवावी.

 गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांनी तालुक्याचा शैक्षणिक आलेख मांडला. त्यांनी सांगितले की, माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३९१ शाळा असून, त्यामध्ये २८ हजार ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी १ हजार ११७ शिक्षक अविरत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत.

​​या सोहळ्यात खालील शिक्षकांचा गौरव करण्यात आला ​विस्तार अधिकारी अस्लम इनामदार, ​केंद्रप्रमुख सिद्धेश्वर भरते,​मुख्याध्यापक  भारत मगर, संभाजी फुले, बाळू शिंदे, युन्नूस तांबोळी, दत्तात्रय पराडे, मधुकर वनसाळे,सहशिक्षक  शीतल जाधव, सुरेश शिंदे, दिलीप उकिरडे, भारती गवळी, सुरेखा काळे, राजश्री जाधव, रमेश सरक, अर्जुन पिसे, आनंद गोंदलवाड, पद्मिनी मारकड, लक्ष्मण भिंगे, अंकुश कोळी, अर्चना कामेगावकर, सुहास उरवणे, धनाजी जाधव, विष्णू जायभाय, दिपाली तापोळे, प्रभाकर कटकदोंड, विजय हेगडे, अयुब काझी, नागनाथ वाघमोडे, वर्षाराणी हेगडे, संगीता पोरे, रुक्मिणी पारसे, जहाँगीर मुलाणी, दत्तात्रय चव्हाण, अमोल सोपनर, नवनाथ क्षीरसागर, किरण गाडगे, संतोष चौगुले, विनोद चंदनशिवे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वतीने किरण घाडगे आणि अर्जुन पिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे, राजाराम गुजर आणि नितीन बनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गटविस्तार अधिकारी असलम इनामदार यांनी मानले.