Breaking

रविवार, १२ एप्रिल, २०२६

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती माळीनगर येथे उत्साहात साजरी

माळीनगर(प्रतिनिधी)-

थोर समाजसेवक व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती व द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात माळीनगर येथे आज शनिवार दि ११ एप्रिल रोजी सकाळी १० वा.विविध संस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 माळीनगर साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊस समोरील क्रांतीसुर्य म.फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सासवड माळी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके,संचालक मोहन लांडे,संचालक विशाल जाधव,ग्रा.पं.सरपंच अनुपमा एकतपुरे,माजी सरपंच अभिमान जगताप,माजी पं.स.सदस्या सुशांता जगताप,ग्रा.पं.चे आजी-माजी सदस्य,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा.चेअरमन कपिल भोंगळे, संचालक मनिष रासकर,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे,संचालक पृथ्वीराज भोंगळे,

म.फुले पतसंस्थेचे संचालक जयवंत चौरे,अंकुश फुले,अमित टिळेकर व संचालक,सेक्रेटरी योगेश कचरे,माळीनगर मल्टिस्टेटचे चेअरमन अमोल गिरमे व संचालक,म.फुले दूध डेअरीचे संस्थापक सेक्रेटरी मिलिंद गिरमे,प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे, जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर,अनिल एकतपूरे,एज्युकेशन सोसायटीचे सर्व विभागाचे शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व समाज बांधव,व्यापारी वर्ग,कारखान्याचे सभासद,खाते प्रमुख, कर्मचारी,ग्रामस्थ व महिला वर्ग यांनी क्रांतीसुर्य म.फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.