माळीनगर (प्रतिनिधी): येथील नारीशक्ती महिला मंडळ, माळीनगर यांच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य 'शुभारंभ व होममिनिस्टर' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता पार पडणार असून, परिसरातील महिलांमध्ये या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्षा, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर अकलूज) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत,त्यामध्ये. अनुपमा एकतपुरे (सरपंच, ग्रामपंचायत माळीनगर) डॉ. मिनाक्षी जगदाळे (अध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, पुणे विभाग) छाया बुराडे (पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, लिनेस क्लब) ॲ.हसिना शेख (मा.सदस्या, पंचायत समिती माळशिरस) तनुजा पाटील (महिला आर्थिक विकास महामंडळ व्यवस्थापन - सीएमआरसी बचत गट) डॉ. सौ. प्रिती गांधी (स्त्री रोगतज्ज्ञ, विवो हॉस्पिटल)
महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'होममिनिस्टर' स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिपाली शत्रुघ्न गायकवाड- राऊत करणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून माळीनगरमधील गृहिणींना त्यांचे कौशल्य आणि बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन नारीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा निवेदिता (राणीताई) बाळासाहेब कदम आणि उपाध्यक्षा विशाखा विराजसिंह निंबाळकर (सदस्या, ग्रामपंचायत माळीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
स्थळ: श्रीहरिनगर लेन नं. ४, माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर
या सोहळ्याला माळीनगर आणि परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन निमंत्रक व नारीशक्ती महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

