Breaking

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

टण्णु येथे अण्णाभाऊ साठे यांची १०६वी जयंती निमित्त प्रतिमा पुजन


प्रतिनिधी....महादेव मोहिते 

मौजे टणु येथे साहीत्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करून टणु ग्रामपंचायत, तसेच मातंग समाज बांधव यांनी आयोजित केलेल्या समाजमंदिर, तसेच जिल्हा परिषद शाळा टणु येथे प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा टणु ग्रामपंचायत माजी आदर्श सरपंच प्रकाश शहाजी मोहिते यांच्या हस्ते आण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


 तसेच समस्त समाजबांधव यांना जयंती उत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी माजी सरपंच राजेंद्र मोहिते, रमेशकाका मोहिते, बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदिप मोहिते , तेजस मोहिते, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ मोहिते,गणेश (आप्पा)मोहीते, दत्तात्रय मोहीते,सतिश जगताप, सामाजिक कार्यकर्ते विकास मोहिते भगवान मोहिते,विलास मोहीते, सत्यवान मोहिते, परमेश्वर जगताप, विकासनाना मोहिते , सोमा देवकर, ऋषीकेश लावंड , राजेंद्र जगताप, विठ्ठल मोहिते, विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते.