Breaking

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ रेशनकार्ड इंदापूर तहसील प्रशासनाचा वेगवान निर्णय


विशेष प्रतिनिधी.. महादेव मोहिते 

इंदापूर: आर्थिक अडचणीमुळे उपचार रखडलेल्या एका कुटुंबाला इंदापूर तहसील कार्यालयाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या कागदपत्रांपैकी रेशनकार्ड नसल्याने रुग्णाचा उपचार अर्धवट राहण्याची वेळ आली होती. ही बाब तहसीलदारांच्या निदर्शनास येताच अवघ्या काही तासांत तात्काळ रेशनकार्ड मंजूर करून देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील  एका रुग्णाला पुढील उपचारासाठी शासकीय योजनेचा लाभ घेणे आवश्यक होते. त्यासाठी रेशनकार्ड हा महत्वाचा पुरावा होता. मात्र, कुटुंबाकडे अद्ययावत रेशनकार्ड उपलब्ध नव्हते.


ही समस्या घेऊन कुटुंबीयांनी आज सकाळी इंदापूर तहसील कचेरीत धाव घेतली. रुग्णाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तहसील प्रशासनाने सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केल्या. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच तात्काळ नवीन रेशनकार्ड तयार करून रुग्णाच्या नातेवाईकांच्या हाती देण्यात आले. या तातडीच्या मदतीमुळे रुग्णाला वेळेत उपचार सुरू करता येणार असून कुटुंबीयांनी तहसील प्रशासनाचे आभार मानले आहेत. वैद्यकीय आणीबाणी साठी सदैव तत्पर असणारे तहसिलदार कचेरीतील पुरवठा शाखेतील 

पुरवठा निरीक्षण अधिकारी- सपन गद्दमवारपुरवठा निरीक्षक - लहू जाधव पुरवठा रेशन कार्ड क्लर्क - तुषार शिंदे यांचे नेहमीच वैद्यकीय कारणासाठी मोलाचे सहकार्य होत असुन लाभार्थी हे समाधानी होत असुन तहसिल कचेरी इंदापूर पुरवठा शाखेत सहानुभूतीपुर्वक विचार करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

वैद्यकीय कारणासाठी आलेल्या कोणत्याही नागरिकाला आम्ही शक्य तेवढी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न करतो. जीव वाचवणे हीच आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.

​— जीवन बनसोडे, तहसीलदार

 या प्रसंगामुळे आणीबाणीच्या आणि गरजेच्या वेळी शासकीय यंत्रणादेखील किती संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करू शकते, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.