Breaking

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा! दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे खात्यात जमा करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

 


राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अत्यंत स्पष्ट आणि तातडीचे निर्देश दिले आहेत.कोणतीही सबब न सांगता दिवाळी सणापूर्वीच पूरग्रस्त बाधितांच्या खात्यात मदतीचे पैसे तत्काळ जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा हवालदील परिस्थितीत आलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर,बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना सण साजरा करता यावा यासाठी प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होऊ नये, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.प्रशासनाने कसलीही सबब (कारण) न सांगता, दिवाळीपूर्वी सबंधित बाधितांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

या निर्देशांमुळे पूरग्रस्त नागरिकांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ कार्यवाही करण्याचे बंधन आले आहे.