Breaking

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

एससी आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करा


प्रतिनिधी...महादेव मोहिते

महाराष्ट्रातील मातंग समाज हा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक सांस्कृतिक आणी औद्योगिक या सर्वांगीण विकास प्रक्रीयेपासुन कोसोदुर राहीलेला आहे .म्हणून या समाजाला विकास प्रक्रियेत आणण्यासाठी एससी प्रवर्गाच्या आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे ,यासाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी दोन नोव्हेंबर पासून मुंबई ते नागपूर महापदयात्रा सुरू केली आहे,ही पदयात्रा आज दि.१२/११/२०२५रोजी इंदापूर येथुन नागपूरच्या दिशेने निघाली होती,यापूर्वी सुद्धा लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाज यांच्या वतीने वारंवार वेगवेगळी निदर्शने मोर्चे काढून या मागणी केली होती; परंतु हे सरकार गेंड्याची कातडी पांगरुन बसल्याने सरकारने याकडे  कानाडोळा केला तसेच गांभीर्याने पाहिले नाही.

 त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार व आदेशानुसार एस सी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्यास यावे .यापूर्वी बऱ्याच राज्यातील सुद्धा एससी आरक्षणामधील अबकड वर्गीकरण केल्याचे या देशामध्ये अनेक उदाहरणे आहेत. परंतु अनेक वेळा महाराष्ट्र शासनाने या समाजाला दिलेल्या आश्वासनाचा अपमान केलेला आहे व फसवणूक केल्यामुळे ही पदयात्रा राजधानी ते उपराजधानी या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या  उपस्थितीत संपन्न होत आहे व नागपूर कडे गेल्यावर मात्र याला मोर्चा चे स्वरूप येणार आहे.व हा समाजाचा रेटा सरकारला अडवणे व डावलणे सरकारला परवडणारे नाही.१२ डिसेंबर २०२५ रोजी १२ वाजता सरकारने जर या मागण्याचा विचार न केल्यास महाराष्ट्र सरकारच्या बारा वाजवल्या जातील असा इशाराही इंदापूर येथे पत्रकारांशी  बोलताना विष्णूभाऊ कसबे यांनी सरकारला दिला आहे याप्रसंगी इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व समाज बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी ही या पदयात्रेत सहभागी झाले होते.