वाघोली: तब्बल ५५ वर्षांनंतर वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी सन १९६६ ते १९७३ या बॅचचा स्नेहमेळावा उत्तमराव माने यांच्या 'जिजाऊ फार्म हाऊस तांबवे या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात नुकताच पार पडला. माजी विद्यार्थी उत्तमराव माने यांनी पुढाकार घेऊन हा अनोखा योग जुळवून आणला आणि सर्व जुन्या मित्रांना एकत्र आणत शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनी भेटलेल्या मित्रांनी एकमेकांना शुभेच्छा देत गप्पांची मैफल जमवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, मरण पावलेले माजी विद्यार्थी रामदास पाटोळे, सुभाष मिसाळ आणि विमल विष्णू मिसाळ (मामी ),यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षक गोविंद नाचणे गुरुजी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,आम्ही सर्व विद्यार्थी आजही गुरुजींचे ऋणी आहोत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही जीवनात यशस्वी होऊ शकलो,असे उद्गार माजी विद्यार्थ्यांनी यावेळी काढले विशेष म्हणजे, गुरुजींची मुले रवींद्र नाचणे आणि रेखा नाचणे हेदेखील याच शाळेत शिकत होते. या कार्यक्रमाला उपस्थित देखील होते तसेच यावेळी प्रमुख मान्यवर या मध्ये विष्णू वासुदेव मिसाळ, श्रीमंत चव्हाण गुरुजी, अधिकराव पवार, सुधीर नाचणे सर,उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थित पाहुण्यांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. यावेळी माजी विद्यार्थी उत्तमराव माने, उत्तम केंगार, मसा कांबळे, विठ्ठल पारसे, विष्णू केंगार, विठ्ठल गेजगे, बाळू मिसाळ, महावीर मिसाळ, रविकांत नाचणे, बशीर मुलाणी, रघुनाथ मिसाळ, अनुसया मिसाळ,आणि मोहनाबाई शेंडगे, अक्काताई माने, सुनील माने तसेच या कार्यक्रमासाठी विठ्ठल गाडे, हनुमंत मिसाळ, भगवान मिसाळ, गोवर्धन पाटोळे, मंगल कोळी,नबीब मुलाणी, शिवाजी मिसाळ, आणि बलभीम मिसाळ उपस्थित होते.
या सुंदर आणि अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव माने यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या सहकार्याने केले होते. आयोजनात अलकाताई माने, मंगल इंगळे, डॉ. अमोल माने, प्रियंका माने, अजित माने, अक्षता माने, दिगंबर माने, सुनिल माने, आणि शिवाप्पा जाधव यांचा सक्रिय सहभाग होता. हा स्नेहमेळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ५५ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा आणि बालपणाच्या आठवणींचा एक भावनिक सोहळा होता.


