Breaking

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

क्षमतेपेक्षा जास्तीची ऊस वाहतूक नागरिकांच्या जिवावर!

बहुजन ब्रिगेड महासंघाच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांचे तातडीने कारवाईचे आदेश.

विशेष प्रतिनिधी...महादेव मोहिते


सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. रस्त्यांवरून धावणारी ही जड वाहने कधीही कोणाच्या अंगावर कोसळतील याचा नेम नसल्याने ही वाहतूक जीवघेणी ठरत आहे या गंभीर प्रकाराबद्दल बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने साखर आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर, आयुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

ट्रॅक्टर-ट्रॉलीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक समस्यांमुळे ही वाहतूक धोकादायक ठरत आहे ट्रॉलीत क्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने तो रस्त्यावर कधीही कोसळू शकतो ,अनेक ट्रॅक्टरना रिफ्लेक्टर (परावर्तक) नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत ट्रॅक्टर कधी नागमोडी तर कधी सरळ धावतात.शहरातून जाताना गतिरोधकावर जोरदार आदळल्याने हुक तुटण्याची भीती.रहदारीच्या रस्त्यांवर दोन ट्रॅक्टर चालक ऊस भरलेले ट्रॅक्टर पळविण्याची शर्यत लावतात,ज्यामुळे दैनंदिन अपघातांचे प्रमाण वाढते दुचाकीस्वार आणि नागरिकांना जीव मुठीत धरून ट्रॉलीच्या कडेने जावे लागते या सर्व बाबींच्या तक्रारीचे निवेदन बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संदीप  मोहिते यांनी दिनांक १०/१०/२०२५ रोजी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य डॉ. संजय कोलते साहेब, पुणे यांना दिले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने साखर आयुक्तांनी या समस्येची गंभीर दखल घेतली.त्यांनी दिनांक ३१/१०/२०२५ च्या पत्रानुसार मा.परिवहन आयुक्त फोर्ट मुंबई यांना तात्काळ आदेश देऊन या धोकादायक ऊस वाहतुकीवर कारवाई करण्याबाबत तसेच ठोस उपाययोजना आणि अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत.