Breaking

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगांव आणि भाळवणी मंडळांचा नुकसानग्रस्त सर्वेक्षणात समावेश करा - आमदार अभिजीत पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी


सोलापूर: माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे  यांच्याकडे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राच्या नुकसान भरपाईसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आमदार पाटील यांनी कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगांव व भाळवणी या दोन मंडळांमध्ये गेल्या १५ दिवसांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने केळी, ज्वारी, ऊस, डाळींब, शेती, घरे आणि शेती उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे. 

कृषी विभागाने दिलेल्या चुकीच्या आकडेवारीमुळे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईमधून भंडीशेगांव व भाळवणी ही दोन्ही मंडळे वगळण्यात आली आहेत  त्यांचा नुकसानग्रस्त सर्वेक्षणात तातडीने समावेश करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या कुंभेज, खैराब, केवड, उंदरगांव, बाकाव, दारफळ (सीना), निमगांव (मा.) व राहुलनगर या ८ पूरग्रस्त गावांना शासनाकडून मिळणारी मदत अपुरी पडत असल्याने  त्यांना तात्काळ वाढीव नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे आमदार अभिजीत पाटील यांनी या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर तातडीने संबंधितांना आदेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.