Breaking

सोमवार, २९ जून, २०२६

मतदारांनो सावधान! उद्यापासून घरी येणार BLO; 'हा' फॉर्म भरला नाही तर नाव होणार कट!


माळशिरस :भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५४-माळशिरस (अ.जा.) मतदारसंघात उद्या, ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अंतर्गत घरपोच मतदार पडताळणीची धडक मोहीम सुरू होत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देतील. मतदार घरी नसल्यास एकूण ३ वेळा संपर्क साधला जाईल. मतदारांना 'गणना फॉर्म' (Enumeration Form) भरून अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. या माहितीचे पुढे संगणकीकरण केले जाईल. जे मतदार फॉर्म भरून देणार नाहीत, त्यांची नावे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या 'प्रारुप मतदार यादीत' समाविष्ट केली जाणार नाहीत.

​३० जून ते २९ जुलै: घरोघरी जाऊन पडताळणी व फॉर्म भरणे.

​५ ऑगस्ट २०२६: प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी (हरकती घेण्याचा कालावधी).

​३ ऑक्टोबर २०२६: अंतिम मतदार यादी प्रसिद्धी.

​उपविभागीय अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. लोकशाही बळकटीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यात सर्व नागरिकांनी 'बीएलओ' यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.