अकलूज (प्रतिनिधी):अकलूज येथील एक उमदा आणि अत्यंत मनमिळाऊ तरुण अरबाज नजीर तांबोळी (वय २१) याचे एका भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. माळशिरस जवळील गारवाड पाटी येथे हा अपघात घडला. या घटनेमुळे अकलूज परिसरासह सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात असून तांबोळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज हा कराड येथील प्रसिद्ध १६ पीर या देवस्थानचे दर्शन घेऊन आपल्या दुचाकीवरून अकलूजच्या दिशेने परतत होता. माळशिरस तालुक्यातील गारवाड पाटी परिसरात आला असता, हा भीषण अपघात झाला.यामध्ये अरबाजचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाची बातमी समजताच अकलूज शहरात शोककळा पसरली.अरबाजच्या पश्चात त्याचे वडील नजीर गुलाब तांबोळी, आई जरीना नजीर तांबोळी आणि विवाहित बहीण महेक अल्ताफ तांबोळी असा परिवार आहे. घरातील तरुण आणि कर्ता मुलगा अचानक सोडून गेल्यामुळे तांबोळी कुटुंबाची न भरून निघणारी हानी झाली आहे.
महाराष्ट्र नगरी न्यूज समूहाची श्रद्धांजली ईश्वर/अल्लाह मृत आत्म्यास शांती देवो आणि तांबोळी परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

